खामगांव,
annabhau sathe लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पुतळा दर्शनीय स्थानी बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी खामगाव शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. गेल्या आठवड्यात स्थानिक रेल्वे स्टेशनच्या गेट समोर लोखंडी रोडवर समाज बांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसविला. त्यानंतर आपण तुला हटविण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. पुतळा काढू नये यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने नगरपालिकेच्या समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

या साखळी उपोषणाला काल 31 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व त्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा वसविण्यासाठी लेखी जाहीर पाठिंबा दिला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्यांच्या कार्याशी साधक सुंदर असा असावा व शहरातील दर्शनीय भागात असावा यासाठी भाजपा प्रयत्न करेल असे या पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले तसेच शहरातील विकसित चौक, गांधी उद्यान व शहर पोलीस स्टेशन समोरील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोर बसविण्यात येण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती सोबत सदैव सोबत राहू असे आश्वासन देण्यात आले.annabhau sathe भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, संजय शिनगारे, शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार नगरपालिका गटनेते नगरसेवक विजय उगले, पाणीपुरवठा सभापती प्रवीण नायसे नगरसेवक विजय शर्मा,सत्यनारायण थानवी,कृष्ण ठाकूर,वैभव डवरे, शेखर कुलकर्णी, पवन गरड, रवी गायगोळ , मयूर घाडगे,नंदकिशोर कांडेकर,रोहन जयस्वाल,रमेश इंगळे,गोलू आळशी, सोनू निभेवानी, पवन ठाकूर,आशिष सुरेका,हितेश पदमगिरीवार,रुपेश शर्मा आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा पत्र सुपूर्द केले.