धनगर समाजाच्या नेत्याने सोडली काँगेसची साथ काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा दिला राजीनामा

01 Apr 2026 10:40:29
अमरावती,
adv dilip edatkar महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व धनगर समाजाचे नेते ऍड. दिलीप एडतकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून तशा अर्थाचा ई-मेल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर व वरिष्ठ नेते डॉ. सुनील भाऊ देशमुख यांना पाठविला आहे.
 
 
धनगर समाजाच्या नेत्याने सोडली काँगेस
 
राजीनामा पत्रात ऍड. एडतकर म्हणतात, आपण मला मी न मागता प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली होती. त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. माझ्या परीने मी ती इमाने इतबारे पार पाडली आहे. तथापि यापुढे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस या नाममात्र पदाला चिकटून राहणे मला शक्य नाही.adv dilip edatkar सबब प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा स्वीकारावा ही नम्र विनंती. ऍड. एडतकर हे धनगर समाजाचे मोठे नेते असल्याने हा राजीनामा अमरावती काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे
Powered By Sangraha 9.0