धरमपेठ शाळेतील माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञता व्यक्त

01 Apr 2026 13:08:41
नागपूर,
Dharampeth School उत्तर अंबाझरी मार्गावरील धरमपेठ शाळेच्या शहापूरकर सभागृहात एक छोटेखानी पण भावनिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शाळेच्या १९७२-७३ च्या बॅचे काही माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या बॅचचे विद्यार्थी तसेच व्हीएनआयटीचे माजी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख आणि संस्थेच्या कार्यसमितीचे सदस्य डॉ. विलास देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. “देश हमें देता है सबकुछ, हम भी तो कुछ देना सीखें” या समूहगीताचा संदर्भ देत त्यांनी आपल्या शालेय आठवणी जागवल्या आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
 
Dharampeth School
 
धरमपेठ हायस्कूलच्या १९७२-७३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात शाळेतील विद्यार्थ्यांच्या ने-आण व्यवस्थेसाठी आर्थिक मदत केली होती. या मदतीचा शेवटचा हप्ता त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती अवधूत यांच्याकडे सुपूर्द केला. या बॅचने दरमहा २५ हजार रुपये प्रमाणे दहा महिन्यांत एकूण २ लाख ५० हजार रुपयांची मदत दिली. Dharampeth School याशिवाय खेळाच्या साहित्याकरिता १० हजार रुपयांची अतिरिक्त मदतही शाळेला देण्यात आली.
 
आपल्या शाळेसाठी काहीतरी करता आले, याचा सर्व माजी विद्यार्थ्यांना आनंद होता. “शाळेने आपल्याला खूप काही दिले आहे, त्याची परतफेड पूर्णपणे शक्य नसली तरी ‘फुल ना फुलाची पाकळी’ अर्पण करण्याची भावना आमच्या मनात आहे,” असे त्यांनी यावेळी व्यक्त केले. मुख्याध्यापिका स्वाती अवधूत यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. Dharampeth School तसेच या बॅचचे विद्यार्थी आणि नागपूरमधील नामवंत चार्टर्ड अकाउंटंट राजीव पेठे यांनी शाळेची गुणवत्ता कशी वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन करत भविष्यातही मदत करण्याची तयारी दर्शवली.
 
कार्यक्रमाच्या शेवटी अलका इनामदार यांनी आभार प्रदर्शन केले. सध्या माजी विद्यार्थ्यांचे अनेक कार्यक्रम होत असले तरी हा कार्यक्रम अत्यंत साधा, स्नेहपूर्ण आणि संवेदनशील वातावरणात पार पडला. Dharampeth School या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना संस्थेचे अध्यक्ष ॲड. उल्हास औरंगाबादकर यांनी, “हा खरोखरच अनुकरणीय आणि प्रेरणादायी उपक्रम असून सर्वांचे मनापासून अभिनंदन,” असे गौरवोद्गार काढले.
सौजन्य: हेमंत घारोटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0