महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीचे दर उंचावले

01 Apr 2026 14:49:41
नवी दिल्ली,
Gold and silver prices rose महिन्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात मोठी हलचाल झाली. १ एप्रिल २०२६ रोजी सोनं आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात एका दिवसात २,८३६ रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर आता १,३७,००५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, जो याआधी १,३४,४०७ रुपये होता. या वाढीनंतर सोनं पुन्हा १.५ लाखांच्या जवळ जात असल्याचे चित्र आहे.
 
 

prices rose
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, आज चांदीचा दर ९,३४८ रुपयांनी वाढून २,३९,४८३ रुपये प्रति किलो झाला आहे. ही वाढ गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.दर वाढण्यामागील कारणे म्हणून जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढलेला कल यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात अस्थिरता असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत.
 
आयबीजेएने (IBJA) सांगितले आहे की जाहीर केलेले दर हे फक्त बेस रेट आहेत, त्यात जीएसटी, मेकिंग चार्ज आणि इतर करांचा समावेश नाही. शनिवार-रविवार आणि सरकारी सुट्ट्यांमध्ये हे दर जाहीर केले जात नाहीत. सोनं आणि चांदीच्या दरातील ही वाढ पुढील काही दिवसांत जागतिक बाजारातील घडामोडींवर अवलंबून राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0