दयाबेन परत येणार नाही – जेनिफर मिस्त्रीचा खुलासा

01 Apr 2026 12:49:18
मुंबई
Dayabenछोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेतील अनेक भूमिका प्रेक्षकांमध्ये गाजल्या. त्यातलीच लोकप्रिय झालेली भूमिका म्हणजे दयाबेन. अभिनेत्री दिशा वकानी हिने दयाबेनची भूमिका जिवंत केली. विशेष म्हणजे दयाबेनची भूमिका गाजत असतांनाच दिशाने या मालिकेतून काढता पाय घेतला. त्यानंतर आजपर्यंत ही भूमिका कोणीही साकारलेली नाही. इतकंच नाही तर दिशा या मालिकेत पुन्हा येईल अशा अनेक चर्चाही रंगल्या. मात्र, या मालिकेत दिशा कधीही झळकणार नाही, असा खुलासा मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री यांनी केला आहे. त्यांना दयाबेन जाण्याने देखील कोणता फरक पडलेला नाही.
 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben 
Powered By Sangraha 9.0