साकोली तालुक्यात वाघाच्या हल्याची तिसरी घटना

01 Apr 2026 11:02:00
भंडारा,
tiger attack मागील 8 दिवसात दोन जणांवर हल्ला करून एकाचा जीव घेत, एका महिलेला गंभीर जखमी करणाऱ्या वाघिणीने आज 1 एप्रिल रोजी पुन्हा आमगाव येथील एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. छाया मुंगमोडे असे गंभीर जखमी महिलेचे नाव असून तिच्यावर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. एकाच परिसरात घडत असलेल्या या घटनामुळे ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत.
 

 वाघाच्या हल्याची तिसरी घटना 
 
10 मार्च रोजी मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या एका इसमावर हल्ला करून त्याचा बळी या वाघिणीने घेतला होता. त्यानंतर उमरझरी येथील सोनवणे नामक महिलेवर शेतात काम करीत असताना वाघिणीने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. महिलेवर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान आज 1 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता याच परिसरातील आमगाव येथील छाया मुंगमोडे शेतावर गेली असता वाघिणीने तिच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. मान आणि कानाला गंभीर इजा झाली असून साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान मागील 15 दिवसात तिसऱ्यांदा घडलेल्या घटनेनी ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले असून वन विभागा विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.tiger attack वाघीण भुकेली असून ती जखमी असावी व त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले तिच्याकडून केले जात असावे, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. मात्र या घटनेनंतर वनविभागाला गांभीर्याने उपाययोजना करणे गरजेचे असून न झाल्यास उद्रेक होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0