नागपूर,
Geet Saurabh Academy गीत सौरभ ॲकेडमीतर्फे ‘राजकुमारी प्रियकामा’ या महाराणी कैकयीच्या बालपणावर आधारित एकपात्री प्रयोगाचा रौप्य महोत्सवी विशेष सादरीकरण सोहम सभागृहात उत्साहात पार पडला. लेखिका, कवयित्री व गीत सौरभ ॲकेडमीच्या अध्यक्षा प्रा. उज्ज्वला अंधारे यांनी प्रभावी अभिनयातून हा प्रयोग साकारला.
कैकयीच्या बालपणातील भावविश्व उलगडणाऱ्या या प्रयोगाने रसिकांना वेधून घेतले. नाट्य, संगीत आणि अभिनयाचा सुंदर संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. Geet Saurabh Academy संहिताही उज्ज्वला अंधारे यांचीच असून सादरीकरणाला विशेष रंगत आली.कार्यक्रमाचे आयोजन ‘सोहम’ या ज्येष्ठ नागरिक संस्थेने केले होते. प्रा. अंधारे यांना विजय बोरीकर (हार्मोनियम) व धर्मेंद्र माहुरकर (तबला) यांची समर्थ साथ लाभली. माया कोंडलवाडीकर व मोहन सरवटे यांची विशेष उपस्थिती लाभली. सोहम संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:वर्षा किडे,संपर्क मित्र