लैंगिक अत्याचार ... कुकर्माची संधी साधून वृद्ध घरात शिरला

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
rape case आईवडिल कामावर गेल्यानंतर घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका वृद्धाला न्यायालयाने 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा दिली. ही घटना पारडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ऑक्टाेबर 2024 मध्ये घडली हाेती. गणपत नानाजी जयपूरकर (वय 56 वर्षे, रा. भवानीनगर, पारडी) असे आराेपीचे नाव आहे.
 

 Nagpur minor rape case 
पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडिल माेलमजुरी करतात. त्यांच्या वस्तीत राहणारा गणपत जयपूरकर हा राहत हाेता. त्याची पीडित मुलीच्या वडिलाशी मैत्री हाेती. त्यामुळे त्याचे नेहमी घरी येणे-जाणे हाेते. 15 ऑक्टाेबर 2024 राेजी सायंकाळी सहा वाजता गणपत घरी आला. त्यावेळी पीडित मुलगी घरात खेळत हाेती. त्याने मुलीला चाॅकलेट दिले आणि तिला घरात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पळून गेला. त्याने मुलीला धमकी दिली. मात्र, रात्री घरी आलेल्या आईला तिने घडलेली घटना सांगितली. या प्रकरणी पारडी पाेलिसांनी rape case लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दुसèया दिवशी गणपतला पाेलिसांनी अटक केली. या प्रकरणात पुरावा आणि सीसीटीव्ही ुटेजवरुन आराेपी गणपतला 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पाेलिस उपायुक्त निकतेन कदम व तपास अधिकारी यांनी यायालयात सदर प्रकरण जलदगती न्यायालयात घेण्याची विनंती केली हाेती. नागपूर पाेलिसांचे विशेष प्रयत्न लक्षात घेता न्यायालयाने सदर प्रकरण 14 महिन्यांत सुनावणी करुन आराेपीस शिक्षा ठाेठावली आहे,