बारदान्याअभावी तूर, चणा खरेदी बंद

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
प्रताप अडसडांनी घेतली पणन मंत्र्यांची भेट
 
धामणगाव रेल्वे, 
या हगामात सुरू असलेल्या तूर व चण्याची खरेदी चांगल्या प्रमाणात होत असताना बारदान्याअभावी खरेदी प्रक्रिया वीस दिवसापासून बंद असल्याने हा बारदाना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी Pratap Adasad  आ. प्रताप अडसड यांना दिले.
 
 
Pratap Adasad
 
अमरावती जिल्ह्यातील हंगाम २०२५-२६ करिता संस्थेमार्फत तूर व चण्याची खरेदी चांगल्या प्रमाणात होत आहे; परंतु बारदान्याअभावी खरेदी प्रक्रिया १५ ते २० दिवसापासून पूर्णपणे बंद पडली आहे. बारदाना खरेदी व पुरवठा प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरेदी केंद्रे बंद राहिल्याने शेतमालाची विक्री ठप्प झाली असून आर्थिक नुकसानही वाढत आहे. याच पृष्ठभूमीवर बारदान्याचा तात्काळ पुरवठा सुरू करून खरेदी प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांची Pratap Adasad  आ. प्रताप अडसड यांनी भेट घेतली. यावेळी दोन-तीन दिवसांत बारदान्याचा पुरवठा करून खरेदी प्रक्रिया सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन जयकुमार रावल यांनी दिले. दरम्यान आ. अडसड यांनी शेतकर्‍याचा ज्वलंत प्रश्न मांडल्याविषयी धामणगाव मतदार संघातील शेतकर्‍यांनी त्यांचे कौतुक केले आहे.