दीड कोटींच्या कापूस गाठींची परस्पर विक्री

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
जिनिंग संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

राळेगाव, 
Selling cotton bales: Fraud महालक्ष्मी जिनिंगमध्ये ठेवलेल्या कापूस गाठींची परस्पर विक‘ी करून तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राळेगाव पोलिसांनी जिनिंगच्या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण तालुक्यात या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची चर्चा सुरू झाली आहे.
 

kapus 
 
Selling cotton bales: Fraud  राळेगावचे विलास मुके (वय ५६) यांनी महालक्ष्मी संचालकांसोबत करार केला होता. या करारानुसार, त्यांच्या एकूण १९९७ कापूस गाठी या जिनिंगमध्ये साठवून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, २१ जानेवारी २०२६ रोजी महालक्ष्मी जिनिंगचे संचालक उर्मिला नंदकुमार गांधी (वय ६१) आणि नंदकुमार गांधी (वय ६४) यांनी मुके यांची कोणतीही परवानगी न घेता आणि त्यांना अंधारात ठेवून या गाठींची परस्पर लावण्यास सुरुवात केली. विलास मुके यांच्या तक‘ारीवरून उर्मिला व नंदकुमार गांधी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) व इतर संबंधित कलमांन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
दीड कोटींचा गंडा
जिनिंगमध्ये ठेवलेल्या एकूण १९९७ गाठींपैकी अंदाजे १२०० गाठी आरोपींनी संगनमत करून विकून टाकल्या. बाजारभावाप्रमाणे १२,५०० रुपये प्रती या दराने या १२०० गाठींची एकूण किंमत १.५० कोटी रुपये होते.