अष्टभूजा मंदिर उर्जा केंद्र : शांताका

वं. मावशी केळकर यांनी स्थापन केलेल्या अष्टभूजा मंदिराचे भूमिपूजन

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
Ashtabhuja Temple Energy Center : Shantaka वर्धेतील अष्टभूजा मंदिर हे वं. मावशी केळकर यांचे तपस्थळ आहे. येथे त्यांनी सलग ४८ तास साधना केली होती. त्यांनीच या मंदिराची स्थापना केली. नारी नारायणही असल्याचा विश्वास त्यांना होता. आज वं. मावशी केळकर यांनी स्थापन केलेल्या त्यांच्याच भुमीत असलेल्या देवी अष्टभूजा मंदिर आहे तसे ठेवून मंदिराचे विस्तारीकरण होते आहे. हा आनंदाचा क्षण आहे. हे शती केंद्र शतिपीठ व्हावे. वं. मावशींचे स्वप्न पुर्ण होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताका यांनी केले. वं. मावशी केळकर यांनी स्थापन केलेल्या देवी अष्टभूजा मंदिराच्या परिसराचे नुतनीकरण कार्याचे भूमिपूजन आज २० रोजी सकाळी ९ वाजता झाले त्यावेळी शांताका बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, राष्ट्रसेविका समितीच्या सर कार्यवाहिका सीता दीदी, प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. शितल भोयर, राष्ट्रसेविका समितीच्या सहकार्यवाहिका तथा अष्टपूजा मंदिराच्या अध्यक्षा चित्रा जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत उपस्थित होते.
 
 
 
mavsh
 
शांताका पुढे म्हणाल्या की, महिलांनी अष्टावधानी असावे यावर वं. मावशी केळकर यांचा भर होता. स्त्रीने राष्ट्र निर्मितीत सक्रिय व्हावे. येथे शतीची उपासना होते हे शतिपीठ व्हावे. यानिमित्ताने मावशीचे स्वन पूर्ण होईल, असे त्या म्हणाल्या. ना. डॉ. पंकज भोयर यांनी भविष्यातली उत्तम पिढी घडण्याकरिता संस्कार शिबिरं देखील या ठिकाणी झाले पाहिजे हे अभिप्रेत धरूनच आपण ठिकाणच्या समितीला सोबत घेऊन ते काम पुढे नेतो आहे. भविष्यात देखील प्रचंड मोठं काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने हाती घ्यायचा आहे. वर्धेला मोठा इतिहास आहे. आजही मोठी कामं होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार होणार्‍या शतिपीठ महामार्गाची सुरुवात वर्धेतून होते आहे आणि वं. मावशी केळकर यांनी निर्माण केलेले हे स्थळही उर्जा केंद्र असल्याचे ना. भोयर म्हणाले.
 
 
 
चित्रा जोशी यांनी सन १९७३ मध्ये जयपूर येथे मावशींनी मूर्ती तयार केली. मावशी येथे नवरात्रीत राहत होत्या. येथे शती जागवली आहे. आता येथे देखणं मंदिर होईल. ते काम सन २०२७ मध्ये पूर्ण करावयाचे असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी मंदिरासाठीची जागा हरदास परिवाराने जागा दान दिली असल्याचा उल्लेख करून आभार व्यत केले. भूमिपूजनापुर्वी मावशी केळकर यांचे नातू माधव व रमा केळकर यांनी देवी अष्टभूजेची पूजा केली. यावेळी आर्किटेट केदार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. राधा पुरी यांनी केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सह संपर्क प्रमुख सुनील देशपांडे, नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख तालुका संघ चालक हिरामण पारिसे, आ. सुमित वानखेडे, माजी आमदार सरोज काशिकर, वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय देशपांडे, उपाध्यक्ष मंगेश परसोडकर, युवा समाजसेवक प्रदीप बजाज, पीव्ही टेस्टाईलचे व्यवस्थापकीय संचालक भूपेंद्र शहाणे, भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय गाते, जयंत येरावार, वैशाली येरावार, सुलभा गौड, अनुराधा भोकरे, कल्पना मशानकर, डॉ. राधा दाभाडे, भरत ज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव संजय जलताडे, मदन परसोडकर, भाजपा जिल्हा महामंत्री कमलाकर निंभोरकर, भारत विद्यालय हिंगणघाटचे सचिव रमेश धारकर, दप्तरी अ‍ॅग्रोचे शैलेंद्र दप्तरी, साई मंदिरचे सचिव सुभाष राठी, भूषण वैद्य, आदी उपस्थित होते.