नागपूर,
Dr. Latika Chawda वर्धा येथील महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या ६व्या दीक्षांत समारंभात डॉ. लतिका चावडा यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. १६ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीने विशेष महत्त्व प्राप्त झाले.
अनुवाद अध्ययन क्षेत्रात ‘गौ-अर्थशास्त्र’ विषयावरील गुजराती–हिंदी द्विभाषिक शब्दसंपदेच्या संशोधनासाठी त्यांना ही पदवी देण्यात आली. बहुभाषिक संशोधक, अनुवादक व भाषा-उद्योजिका म्हणून डॉ. चावडा कार्यरत असून भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी त्या योगदान देत आहेत. Dr. Latika Chawda या यशाबद्दल त्यांनी गुरुजन व कुटुंबियांचे आभार मानत ही उपलब्धी भारतीय भाषांच्या प्रसारासाठी समर्पित केली.
सौजन्य:रुपल दोडके,संपर्क मित्र