हंडाभर पाण्यासाठी गादेगाव वासियांची पायपीट

पेयजल उपलब्ध न केल्यास ग्रामस्थ करणार आंदोलन

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
मानोरा,
Gadegav water shortage तालुयातील शेवटच्या टोकावरील व दिग्रस तालुयाच्या सिमेवरील गादेगाव हे २२०० लोकवस्तीचे गाव असून, ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व माजी आमदार गजाधर राठोड यांनी निर्माण केलेली २८ गावातील जीवन प्राधिकरनाची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असतानाही गादेगाव तांडा येथे गटातटातील राजकारणामुळे लग्नसराईत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या जीवघेण्या समस्येवर २२ एप्रिल पर्यंत उपाययोजना करून गावातील पणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायत कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच भारत आडे यांनी दिला आहे.
 

Gadegav water shortage 
गावात पाणीपुरवठा Gadegav water shortage करण्यासाठी तीन-तीन योजनाची पाणीपुरवठा पाईपलाईन व पाण्याची टाकी अस्तित्वात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गावात लग्नसराई, सनासुदीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. अशा उष्ण तापमानात पाणीपुरवठा योजना खंडित झाल्यामुळे गुंडभर पाण्यासाठी तांड्यातील महिलांवर दाही दिशा वन - वन फिरण्याची पाळी आली आहे. आधीच तीव्र उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना, शासनाच्या वतीने उन्हापासून सरक्षण व्हावे म्हणून उपाययोजना सांगत घराच्या बाहेर न निघण्याचे सल्ले दिल्या जात आहेत. परंतु ग्रामविकासाच्या अंतर्गत येणार्‍या गादेगाव ग्रामपंचायतीत या उन्हाळ्याच्या काळात महिला व जनावरांची पर्वा न करता राजकीय खेळी खेळल्या जात आहे. त्यामुळे गावकर्‍यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पायाला भींगरी बांधून फिरनारे उत्साही उमेदवार मात्र या समस्येवर मुंग गिळून बसले असून संकटाच्या काळात ठंडी हवा घेत झोपी गेले असल्याची भावना गादेगाव वासीयातून व्यक्त करण्यात येत आहे. आमच्या गावात पाण्यासाठी राजकारण करून पाणीटंचाईसाठी नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार चालू आहे. या समस्येवर स्थानिक पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकारी पदाधिकार्‍यांनी व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाणीटंचाईचे निवारन न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी सरपंच भारत याडे यांनी दिला आहे.
 
पाणीटंचाईसाठी कृती आराखडा मंजूर करा : नामा बंजारा
ए. सी. आणि कूलरची ठंडी हवा घेत गावातील भीषण संकटाकड़े दुर्लक्ष करणार्‍या तालुयातील पंचायत समिती प्रशासनाने पाणीटंचाईची गंभीर दखल घेऊन ज्या ज्या गावात पाण्याची टंचाई आहे अशा गावात वीहीर अधिग्रहण, बोर अधिग्रहण, टैंकर व्यवस्था असा तात्काळ कृती आराखडा तयार करून तालुयातील ज्या गावात पाणीटंचाई आहे, अशा गावांना या वीहीर अधिग्ररण, बोर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा करावा अन्यथा पाणी टंचाईसाठी पंचायत समिती प्रशासना विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहीती अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी म्हटले आहे.