खरीप हंगामासाठी आधुनिक शेती पद्धतींचे प्रात्यक्षिक

शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
मानोरा,
Kharif season तालुयातील सोमेश्वर नगर येथे २० एप्रिल रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व तालुका कृषी विभाग अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान खरीप चा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेणार्‍या आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.
 

Kharif season  
कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, तंत्रज्ञान समन्वयक नागेश ठाकरे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी आर. डी. हाके यांनी शेतकर्‍यांना बेड तयार करण्याची योग्य पद्धत, त्याचे फायदे तसेच बेडवर टोकन पद्धतीने लागवड कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. यासोबतच शून्य मशागत पद्धत व अंतरपीक पद्धतीबाबत सखोल मार्गदर्शन करून शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तज्ञ अधिकार्‍यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकते. मृदा संवर्धन, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पिकांची जोखीम कमी करण्यासाठी या पद्धती अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकर्‍यांनी विविध शेतीविषयक प्रश्न विचारले असता मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले.
या वेळी गावातील Kharif season रामराव जाधव, बंटी चव्हाण, उत्तम आडे, बळीराम जाधव, संजय जाधव, नंदू आडे, अरविंद जाधव, संतोष जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी ताई तसेच समूह सहाय्यक प्रफुल राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.