सांगली
Sangli politics सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून गट नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावरून वातावरण चांगलंच तापलं असून, शहर राष्ट्रवादीच्या 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत,
यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सोपवले आहेत. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत गटनेते मैनूद्दीन बागवानांकडून पक्षाचा आदेश डावला गेल्याचा आरोप या नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनंतर सांगली राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असून, Sangli politics तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. दुसरीकडे शहर जिल्हाध्यक्ष पदमाकर जगदाळे यांनी देखील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी देखील गटनेते बागवान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.