नागपूर,
Paranjape School बजाज नगर येथील ले. कर्नल व्ही. डी. परांजपे मेमोरियल सेकंडरी स्कूलच्या १० वी ‘बी’ (२००५ बॅच) च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेसाठी आर्थिक योगदान देत ऑडिओ-व्हिज्युअल उपकरणे व विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट हॅम्पर्स भेट दिले.
यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.Paranjape School कार्यक्रमाला अध्यक्षा शैलाफडणवीस, सचिव रंजना पारधी तसेच भावना खरे यांची उपस्थिती होती. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सौजन्य:शेफाली तळवलकर,संपर्क मित्र