१० लाखांचे दागिने चोरी

Pune Railway Station

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
पुणे,
Pune Railway Station पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या प्रचंड गर्दीत पुन्हा एकदा चोरट्याने हात साफ करत सुमारे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. मात्र, लोहमार्ग पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या १२० मिनिटांत या चोरीचा छडा लावण्यात आला असून आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
 

Pune Railway Station 
ही घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडली. एका प्रवाशाची सोन्याचे दागिने असलेली पर्स गर्दीचा फायदा घेत चोरट्याने चोरून नेली. या पर्समध्ये सुमारे १० लाख रुपये किंमतीचे दागिने असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी आणि RPF पथकाने तात्काळ तपास सुरू करत स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.तांत्रिक तपास आणि समन्वयाच्या जोरावर पोलिसांनी आरोपीचा माग काढत अवघ्या दोन तासांत त्याला ताब्यात घेतले. राजकुमार शंकर पवार (वय ३३, रा. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून तो सुरक्षितपणे संबंधित प्रवाशाला परत मिळाला आहे.लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या या संयुक्त कारवाईमुळे पुणे रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारी घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवता येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा कारवाया पुढेही अधिक कडकपणे सुरू ठेवण्यात येतील, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.