आमदार कुणावार धावले नन्नावरे कुटुंबीयांच्या मदतीला

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
हिंगणघाट,
Samir Kunawar नजीकच्या कुकाबर्डी येथील आगीत सर्वस्व गमावलेल्या कुकाबर्डी येथील नन्नावरे कुटुंबाला आमदार समीर कुणावार यांनी मोठा आधार दिला. केवळ कोरडे सांत्वन न करता, आमदारांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाला तातडीची मदत सुपूर्द केली. त्यामुळे उघड्यावर आलेल्या या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
 

Samir Kunawar help fire victim family, Hinganghat Kukabardi fire incident,  
कडाजना ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या कुकाबर्डी येथे संभा गोविंद नन्नावरे यांच्या घराला लागलेल्या आगीत घर, संसारोपयोगी साहित्य आणि चार शेळ्या जळून खाक झाल्याची माहिती मिळताच आ. समीर कुणावार यांनी रविवारी त्यांच्या घरी भेट दिली. जळालेल्या घराची पाहणी करताना नन्नावरे कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था पाहून त्यांनी तातडीने मदतीचे प्रयत्न चालविले. आमदार कुणावार यांनी नन्नावरे कुटुंबाला घर उभारण्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करून दिले. कुटुंबाच्या भोजनाची सोय व्हावी यासाठी धान्य, किराणा तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा संच पाठविण्याचीही व्यवस्था केली. तुमचा संसार पुन्हा सुरळीत उभा होईस्तोवर मी तुमच्या सोबत आहे, अशा शब्दांत त्यांनी कुटुंबाला धीर दिला.
संकटाच्या काळात कोणताही Samir Kunawar  विलंब न लावता मदतीसाठी धावून आलेल्या आमदार समीर कुणावार यांच्या तत्परतेबद्दल कुकाबर्डी येथील ग्रामस्थांनी आभार मानले. आमदार कुणावार यांनी दिलेल्या या आधारामुळे आम्हाला पुन्हा उभं राहण्याची शती मिळाली, अशी भावना संभा नन्नावरे यांनी व्यत केली. या भेटी दरम्यान जिपचे माजी अध्यक्ष नितीन मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, पप्पू मोहता, अभिजीत बिडकर आदी उपस्थित होते.