ऑटोचालकाच्या मुलाचे एमबीबीएस स्वप्न पूर्ण

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Satyam Kakade वानाडोंगरी येथील ऑटो रिक्षा चालक भोला काकडे यांचा मुलगा सत्यम काकडे याने एमबीबीएस पदवी प्राप्त करून यश संपादन केले आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर येथे शिक्षण घेतलेल्या सत्यमला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, नाशिकतर्फे पदवी प्रदान करण्यात आली.
 
780
 
साध्या कुटुंबातून येणाऱ्या सत्यमने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. वडील ऑटोचालक तर आई गृहिणी असून,Satyam Kakade  कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही त्याने हे यश मिळवले“मुलाने आमचे स्वप्न पूर्ण केले, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” अशा भावना वडील भोला काकडे यांनी व्यक्त केल्या.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र