नागपूर,
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे शीख धर्माच्या इतिहासाला समर्पित “हिंद-दी-चादर” या भव्य प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी वर्षानिमित्त सुमारे 260 कोटी रुपयांचा हा ग्लोबल स्पिरिच्युअल आणि हेरिटेज टुरिझम प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पात जगातील सर्वात उंच 350 फूट उंचीचा निशान साहिब उभारण्यात येणार असून पंच तख्त परिसराचे मॉडेल तसेच Kartarpur Sahib आणि Nankana Sahib यांच्या प्रतिकृती एकाच ठिकाणी साकारल्या जाणार आहेत. याशिवाय अत्याधुनिक डिजिटल म्युझियम व लाईट अँड साऊंड शोची सुविधा उपलब्ध राहणार आहे.हा प्रकल्प नागपूरला आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यास हातभार लावणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.या प्रकल्पाचे नेतृत्व Gurmeet Singh Khokhar करत असून संकल्पना मनीष पाटील यांनी मांडली आहे. “सरबत दा भला” या संदेशातून समाजकल्याणाचा व्यापक उद्देश या उपक्रमामागे असल्याचे सांगण्यात आले.
सौजन्य:काजल छेती,संपर्क मित्र