ज्योतिबा विद्यालयात ई-वेस्ट संकलन शिबिर

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Jyotiba Secondary School लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेअंतर्गत ज्योतिबा माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे ई-वेस्ट संकलन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तूंबाबत जागरूकता निर्माण होऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची सवय लहान वयातच रुजावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
 
 
79
 
 
यावेळी झोनल अधिकारी आनंद खोडसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उपक्रमाचे कौतुक केले. प्राचार्या अरुणा कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले.Jyotiba Secondary School पर्यवेक्षक वांदे, श्री. चोपडे तसेच सर्व शिक्षकांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.
सौजन्य:अरुणा कडू,संपर्क मित्र