मराठी सक्तीवरून वाद पेटला..आंदोलनाचा इशारा

    दिनांक :23-Apr-2026
Total Views |
मुंबई
auto rickshaw drivers राज्यात टॅक्सी व रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याच्या प्रस्तावावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. १ मेपासून हा निर्णय लागू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याला तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईतील सुमारे पाच लाख टॅक्सी व रिक्षा चालकांच्या पाठीशी आपण उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, या मुद्द्यावरून संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

Marathi language mandate Maharashtra, taxi driver Marathi requirement Mumbai, auto rickshaw drivers Marathi rule, 
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मराठी भाषा सक्तीबाबत निर्णय प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात परिवहन आयुक्त, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच भाषा तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत टॅक्सी व रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा होत आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्याचा विचार पुढे आला असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्य शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्याचीही योजना आहे.
सरकारकडून मिळालेल्या auto rickshaw drivers  माहितीनुसार, भविष्यात वाहन परवाना मिळवताना मराठी भाषेचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचाही विचार सुरू आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा येणे आवश्यक असल्याची भूमिका मंत्री सरनाईक यांनी स्पष्टपणे मांडली आहे. राज्यात राहून मराठी शिकण्यास नकार देणे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, सदावर्ते यांनी या निर्णयावर आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. हा निर्णय केवळ सक्तीचा असून चालकांच्या अडचणींचा विचार न करता घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मुद्द्यावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर येत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
 
 
सरकारकडून मराठी शिकण्यासाठी auto rickshaw drivers दोन पानी पुस्तिका तयार करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. तसेच मराठी शिक्षणाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांकडून चुकीचे परवाने किंवा परमिट देण्यात आले असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यातील वाहतूक क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारचा निर्णय आणि सदावर्ते यांचा विरोध यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.