मानोरा,
Carakheda girl study inspiration, आकांक्षीत तालुक्याला सर्व बाबतीत पुढे नेण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व कारखेडा येथील एका शाळकरी मुलीने ओळखले आहे. मोबाईलच्या युगात देहभान विसरून अभ्यासाला प्राधान्य देणार्या सावित्रीच्या या लेकीची प्रेरणा गावातील इतर विद्यार्थ्यांनी घेण्याची आवश्यकता प्रकर्षाने पुढे येत आहे.
कारखेडा येथील एक शाळकरी मुलगी झोपडीच्या प्रवेशद्वारावर दगडी पायर्यावर बसून एकाग्रतेने पुस्तक वाचत आहे. पायात चप्पल नसताना, अंगावर साधे निळे टीशर्ट आणि काळी पॅन्ट असलेल्या या मुलीच्या चेहर्यावर शिक्षणाप्रती असलेली तळमळ स्पष्ट दिसते. पत्रे आणि ताडपत्रीने झाकलेली कच्ची झोपडी, वार्यावर वाळत घातलेले कपडे आणि आजूबाजूला वाढलेली वेलवर्गीय झाडे ही तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती दर्शवतात. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आकर्षणात अडकलेल्या आजच्या पिढीतही ही मुलगी अभ्यासाला सर्वाधिक महत्त्व देत आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि साधनांचा अभाव असतानाही शिक्षण हेच जीवन बदलण्याचे एकमेव साधन आहे, हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे. ही मुलगी केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी एक Carakheda girl study inspiration, आदर्श बनली आहे. तिच्या या चिकाटीमुळे आणि जिद्दीमुळे गावातील इतर मुला मुलींनाही शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांप्रमाणे मुलींच्या शिक्षणाला चालना देणारे हे उदाहरण आहे. मुलीच्या अभ्यासाच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. अशा मुलींच्या जिद्दीमुळेच गावाचे आणि तालुक्याचे भविष्य उज्वल होईल. शासनानेही अशा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
शिक्षणाने अज्ञानाचे अंधकार दूर करून प्रगतीचा मार्ग खुला होतो, हे या मुलीने दाखवून दिले आहे. तिचा हा ज्ञानदीप संपूर्ण तालुक्याला नक्कीच प्रकाशमान करेल असा आशावाद कै. केएल देशमुख शाळेचे विश्वस्त योगेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.