अभिनेत्री गायत्री दातारच्या घरी लगीनघाई

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |

Gayatri Datar
 
 
मुंबई,
Gayatri Datar's wedding सध्या लग्नसराईचा हंगाम रंगात आला असून सर्वसामान्यांप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रातही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार विवाहबंधनात अडकत असताना आता गायत्री दातार हिच्याही लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री लवकरच आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तिच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून अलीकडेच पार पडलेल्या ग्रहमुख विधीचे फोटो तिने समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. दरम्यान, तिच्या होणाऱ्या जोडीदाराच्या घरीही लग्नाआधीचे पारंपरिक विधी सुरू झाले आहेत. श्रीकांतने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले असून त्याला प्रवास आणि छायाचित्रणाची विशेष आवड आहे. गायत्री आणि श्रीकांत यांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी येत्या काही दिवसांत हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही या लग्नाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.