नागपूर,
Indigenously developed train प्रवासी सुरक्षेला आणि आधुनिकीकरणाला प्राधान्य देत मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने स्वदेशी विकसित ट्रेन टक्कर प्रतिबंधक प्रणाली कवचची लोकोमोटिव्ह इंजिनवर स्थापना यशस्वीपणे सुरू केली आहे. ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली भारतीय रेल्वेच्या एकूणच सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित बळकटी देण्याच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग होय.
चालू आर्थिक वर्षात नागपूर मंडळातील लोको शेडमध्ये ११ ए.क्यू. आधारित लोकोमोटिव्हमध्ये ‘कवच’ प्रणाली बसविण्यात आली आहे. Indigenously developed train प्रत्येक लोकोमोटिव्हची समर्पित चाचणी ट्रॅकवर सखोल तपासणी करण्यात आली, ज्यायोगे प्रणालीची कार्यक्षमता आणि निर्धारित सुरक्षा निकषांची पूर्तता सुनिश्चित करण्यात आली. सर्व प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रमाणित करून नियमित सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे.
रिअल-टाइम संवाद प्रस्थापित
‘कवच’ ही स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली असून ती लोकोमोटिव्ह आणि सिग्नलिंग प्रणाली यांच्यात रिअल-टाइम संवाद प्रस्थापित करून रेल्वे अपघात, विशेषतः धडक Indigenously developed train टाळण्यास महत्त्वाची भूमिका असल्यामुळे रेल्वे संचालन अधिक सुरक्षित बनते. नागपूर मंडळ आगामी टप्प्यांमध्ये अधिक लोकोमोटिव्हमध्ये ‘कवच’ प्रणालीचा करण्यास कटिबद्ध आहे.