रणवीरच्या ‘रामायण’चा जागतिक डंका

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |

डंका
 
 
 
मुंबई,
Ranveer's 'Ramayana' hits the world रणबीर कपूर अभिनीत आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. दरम्यान, आता या चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाबाबत नवी माहिती समोर आली आहे. ‘द फिथियन ग्रुप’चे प्रमुख जॉन फिथियन यांनी या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत. चित्रपट निर्माते नमित मल्होत्रा आणि यश यांनी जागतिक स्तरावर चित्रपट सादर करण्यासाठी त्यांच्या कंपनीशी सहकार्य केले आहे. या निमित्ताने अमेरिकेसह कॅनडा, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथील प्रमुख चित्रपटगृह साखळ्यांसमोर चित्रपटातील काही खास दृश्ये दाखवण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि भव्य दृश्यरचना पाहून परदेशातील वितरकांनी चित्रपटाचे विशेष कौतुक केल्याची माहिती देण्यात आली आहे.प्रदर्शनाच्या तारखेबाबत बोलताना जॉन फिथियन यांनी सांगितले की, या चित्रपटाची परदेशातील प्रेक्षकांसाठी तयार केलेली आवृत्ती नोव्हेंबर २०२६ च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. भारतात मात्र हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर, ऑक्टोबरच्या अखेरीस प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे