मुंबई,
Sameer Chaughule met Raj Thackeray लोकप्रिय विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहोचलेले अभिनेते समीर चौघुले सध्या आपल्या एकपात्री प्रयोगामुळे चर्चेत आहेत. ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या कार्यक्रमाचे शंभर प्रयोग पूर्ण झाल्याच्या आनंदात त्यांनी एक खास अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या यशानंतर त्यांना अनेक शुभेच्छा मिळाल्या, मात्र एक फोन त्यांच्यासाठी विशेष ठरला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः त्यांना फोन करून भेटीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर दादर येथे झालेल्या या भेटीत दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या. या भेटीत हास्यजत्रा कार्यक्रमाविषयीही प्रेमाने चर्चा झाली.समीर चौघुले यांनी सांगितले की, ही भेट अत्यंत आनंददायी आणि लक्षात राहणारी ठरली. विशेष म्हणजे, त्यांच्या शंभर प्रयोगांच्या यशाबद्दल राज ठाकरे यांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला खास भेटवस्तू देऊन गौरवही केला. या सन्मानाबद्दल समीर यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे.