जबरी चाेरीत दाम्पत्यासह तिघांना अटक

वृद्धेची हिसकावली हाेती साेनसाखळी

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
arrested in robbery वृद्ध महिलेची दिशाभूल करून तिला ऑटाेरिक्षामध्ये बसवून गळ्यातील साेनसाखळी हिसकावणाऱ्या टाेळीचा गुन्हेशाखेने पर्दााश करत दाम्पत्यासह तिघांना अटक केली आहे. कृष्णा कल्लू जाटव (वय 24), शिवानी कृष्णा जाटव (वय 22, दाेन्ही रा. जाटतराेडी, इमामवाडा) आणि कॅटरिना युसूफ थामस (वय 22, रा. इंदिरामाता नगर, यशाेधरानगर) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत.
 
 
robbery
 
मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल राेजी दुपारी सुमारे 12.30च्या सुमारास फिर्यादी पार्वतीबाई दयाल पाटी (वय 83, रा. भीमनगर, बुद्धविहारजवळ, रामेश्वरी) या मेडिकल रुग्णालयात उपचार करून घरी परतत हाेत्या. त्यावेळी एका ऑटाेरिक्षा चालकाने रामेश्वरीकडे जाणार असल्याचे सांगून त्यांना रिक्षात बसवले. त्या रिक्षात आधीच दाेन महिला बसलेल्या हाेत्या. दरम्यान, चालकाने रिक्षा वेगळ्याच दिशेने नेण्यास सुरुवात केली. arrested in robbery संशय आल्याने पार्वतीबाईंनी आरडाओरडा केला. त्यानंतर चालकाने रिक्षा इमामवाडा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे मेन्स स्कूलजवळ थांबवली. त्या रिक्षातून उतरून पुढे जात असतानाच रिक्षातील एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सुमारे 29 मण्यांची साेन्याची पाेत अंदाजे किंमत 10 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर सर्व आराेपी तेथून पसार झाले. या घटनेप्रकरणी इमामवाडा पाेलिस ठाण्यात अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला हाेता.

 
आराेपी इमामवाडा पाेलिसांच्या ताब्यात
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेशाखेच्या साेनसाखळी चाेरी विराेधी पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गाेपनीय माहितीच्या आधारे पाेलिसांनी आराेपींचा माग काढत सापळा रचला. या कारवाईत आराेपी कृष्णा, शिवानी आणि कॅटरिना या तिघांना अटक करण्यात आली. arrested in robbery चाैकशीदरम्यान आराेपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पाेलिसांनी आराेपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एमएच-49/सीएफ-3154 क्रमांकाची ई-रिक्षा जप्त केली असून पुढील तपासासाठी आराेपींना इमामवाडा पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हेशाखेच्या साेनसाखळी चाेरी विराेधी पथकाच्या महिला सहायक पाेलिस निरीक्षक मंगला हरडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.