मला हिंदू मुलीच आवडतात!

मुंबईत पुन्हा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
मुंबई,
women's safety in Mumbai मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंतेची भावना निर्माण करणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला तिच्याच सहकाऱ्याकडून सातत्याने अयोग्य संदेश आणि फोनद्वारे त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने मेसेजमध्ये “मला हिंदू मुलीच आवडतात” असे म्हणत तरुणीचा मानसिक छळ केला. या प्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतर आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
 
 
 
women
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव अश्रफ सिद्दिकी असे असून तो समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती आहे. पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही मुंबईतील एका खासगी कंपनीत टेलिकॉलर म्हणून काम करत होते. २१ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने नोकरीसाठी मुलाखतीला आलेल्या मुलींचे मोबाईल क्रमांक मिळवले आणि त्याचा गैरवापर करत त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. पीडित तरुणीला त्याने वारंवार अश्लील आशयाचे संदेश, छायाचित्रे आणि चित्रफिती पाठवल्याचे समोर आले आहे. यामुळे तिचा मानसिक छळ झाला असल्याचेही सांगितले जात आहे.
 
 
इतकेच नव्हे, तर आरोपीने तिचा पाठलाग केल्याची बाबही तपासात उघड झाली आहे. प्राथमिक चौकशीत आणखी काही तरुणींनाही अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आल्याचे संकेत पोलिसांना मिळाले आहेत. या सर्व प्रकारामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे, तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणे आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर समाजातील विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, महिलांनी कोणत्याही भीतीशिवाय पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.