मुंबई,
Aapla Dawakhana राज्यातील झोपडपट्टी परिसरातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’’ योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य शासनाने यासंदर्भात शुद्धीपत्रक जारी करत, औषध निर्माण अधिकारी या पदनामाऐवजी बहुउद्देशीय कर्मचारी असा बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने 11 जुलै 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध शहरांतील झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे 700 ठिकाणी ‘आपला दवाखाना’ उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या केंद्रांद्वारे सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचा उद्देश आहे.मात्र, मूळ शासन निर्णयातील काही पदनामांमध्ये तांत्रिक दुरुस्ती आवश्यक असल्याचे लक्षात आल्याने शासनाने हे शुद्धीपत्रक काढले आहे. त्यानुसार, ज्या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी असा उल्लेख करण्यात आला होता, त्या सर्व ठिकाणी आता बहुउद्देशीय कर्मचारी असा उल्लेख वाचण्यात येणार आहे.या बदलामुळे दवाखान्यांमधील मनुष्यबळ रचना अधिक लवचिक आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, आरोग्य सेवा पुरविताना विविध जबाबदाèया एकाच कर्मचाèयाकडून प्रभावीपणे पार पाडता येतील, असा प्रशासनाचा विश्वास आहे.दरम्यान, राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सदर Aapla Dawakhana शुद्धीपत्रक शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, हा आदेश डिजिटल स्वाक्षरीद्वारे जारी करण्यात आला आहे.