भंडारा,
Bhandara News जिल्ह्यातील जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त प्रगणकांचे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधीच शिक्षकांसमोर गंभीर तांत्रिक अडचणी उभ्या ठाकल्या असून बीवायओडी च्या नावाखाली मोबाईल खरेदीची सक्ती केली जात आहे. जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या एचएलओ ॲपमुळे शिक्षकांवर अनावश्यक आर्थिक ताण येत असल्याची नाराजी शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
शासनाने जनगणना प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी खास मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण शिक्षकांचे टप्प्या टप्प्याने प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणानंतर प्रगणकांना घरोघरी जाऊन माहिती संकलित करून ती या ॲपमध्ये अपलोड करायची आहे. Bhandara News मात्र, अनेक शिक्षकांच्या मोबाईलमध्ये हे ॲप सुरूच होत नसल्याने संपूर्ण प्रक्रिया अडखळण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक शिक्षकांकडे अँड्रॉइड ११ किंवा त्यापूर्वीच्या आवृत्तीचे मोबाईल आहेत. संबंधित ॲप अँड्रॉइड १२ किंवा त्या पुढील आवृत्ती मध्येच चालत असल्याने ते डाउनलोड होत नाही.
शिक्षकांना ॲप अपडेट करा असा संदेश मिळाल्यामुळे अनेक शिक्षकांनी ॲप अपडेट केले. मात्र, त्यानंतर ॲप न उघडणे, लॉगिन न होणे अशा समस्यांमुळे शिक्षक अक्षरशः वैतागले आहे. त्यातच प्रशिक्षकांकडून स्वतःच्या खिशाला कात्री लावून मोबाईल खरेदी करण्याचा अजब सल्ला दिल्या जात असल्याने शिक्षकाने नाराजी व्यक्त केली आहे. Bhandara News याबाबत प्रशिक्षणा दरम्यान विचारणा केली असता, “नवीन मोबाईल स्वतःच्या पैशाने घ्या,” असा अजब सल्ला प्रशिक्षकांकडून देण्यात आल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. त्यामुळे जनगणना ही शासकीय जबाबदारी असताना त्यासाठी आवश्यक साधनांचा खर्च शिक्षकांनी का उचलावा? असा सवाल उपस्थित होत आहे.
याशिवाय, मोठ्या प्रमाणात डेटा अपलोड करण्यासाठी अधिक मेमरीची गरज भासत असून, कमी क्षमतेच्या मोबाईलमध्ये डेटा साठवण्याबाबतही अडचणी निर्माण होत आहेत. Bhandara News जनगणनेचा डेटा मार्च पर्यंत सुरक्षित ठेवण्याची अट असल्याने मोबाईल हरवणे किंवा डेटा नष्ट होण्याची भीतीही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
ब्रिंग युवर कोण डिवाइस म्हणजेच बीवायओडी
या धोरणा अंतर्गत स्वतःचा मोबाईल वापरण्याची अट घालण्यात आली आहे, मात्र यावर शिक्षकांनी आम्ही आमचाच मोबाईल वापरत आहोत परंतु आमच्या मोबाईल मध्ये ॲप चालत नसल्याने ही अट व्यवहार्य नसल्याची टीका केली आहे. Bhandara News याच पार्श्वभूमीवर, संबंधित ॲप अँड्रॉइड १२ ऐवजी अँड्रॉइड ११ वरही चालेल, असे सॉफ्टवेअर विकसित करावे किंवा प्रगणकांना टॅब उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्रगणक शिक्षकांकडून करण्यात येत आहे.