‘एअर’ बंद झाल्याने प्रवाशांची ‘कंडिशन’ बेक्कार!

दिल्ली विमानतळावर गोंधळ

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
Air India दिल्लीहून इंदूरला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-२५१५ विमानाला तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरून परत टर्मिनलवर आणावे लागले. धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात वातानुकूलित यंत्रणा बंद करण्यात आली. प्रचंड उष्णता आणि बंद केबिनमध्ये तासभर अडकल्याने प्रवाशांची तब्येत बिघडायला लागली.
air india
 
Air India दिल्ली विमानतळावर प्रवाशांनी परताव्याची मागणी करत घोषणाबाजी केली. हे विमान दररोज दुपारी १२.१० वाजता दिल्लीहून उड्डाण करते आणि १.४५ वाजता इंदूरला पोहोचते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्याला उशीर झाला.
Air India यापूर्वी ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत इंदूरला पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु सुमारे ३ तासांच्या विलंबानंतर ते सायंकाळी ५.१५  वाजता पुन्हा रवाना झाले, जे अंदाजे ६.३० वाजता इंदूरला पोहोचले. तथापि, यापूर्वी एका प्रवाशाने सांगितले होते की - एअर इंडियाने विमान रद्द केले आहे.
Air India या घटनेची सुरुवात दिल्ली विमानतळावर गेट बदलण्यापासून झाली. बोर्डिंगपूर्वी दोनदा गेट बदलण्यात आले, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. प्रवाशांना विमानात बसवल्यानंतर तांत्रिक मंजुरी न मिळाल्याने विमान बराच वेळ धावपट्टीवर उभे ठेवण्यात आले.