पुणे
firing incident शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र असताना आज सायंकाळी वारजे परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एका सलूनमध्ये घुसून काही अज्ञातांनी गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार जणांनी सलूनमध्ये प्रवेश करून अचानक गोळीबार केला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी firing incident तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई सुरू केली. प्राथमिक तपासात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. गोळीबारासाठी वापरलेली बंदूक आरोपीच्या हातातच फुटल्याचीही माहिती समोर आली आहे, त्यामुळे त्यालाही किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.या गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून, वैयक्तिक वाद, आर्थिक कारणे किंवा इतर कोणतेही गुन्हेगारी कनेक्शन आहे का, याचा शोध घेतला जात आहे.दरम्यान, वर्दळीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे शहरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून काही प्रकरणांमध्ये गँगवॉरचा संबंध समोर आला होता. त्यामुळे या घटनेमागेही काही गुन्हेगारी टोळीचा हात आहे का, याबाबतही तपास सुरू आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. पुढील काही तासांत या प्रकरणात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.