तू माझाशी शारीरिक संबंध ठेव!

पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासातून तरुणाची आत्महत्या

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
हिंगोली,
suicide due to harassment by police officer नांदेड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या गंभीर गैरवर्तनामुळे मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणावर मानसिक दबाव टाकल्याच्या आरोपानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ लाखाडे (वय २४, रा. वडगाव, ता. कळमनुरी) या तरुणाची नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या अभिषेक सातपुते या कर्मचाऱ्याशी सुमारे दहा वर्षांपासून मैत्री होती. आरोपानुसार, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याकडून नवनाथ यांच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केली जात होती.
 
suicide photo
 
या त्रासामुळे तो तरुण मानसिकदृष्ट्या खचला होता. सततच्या दबावामुळे तो प्रचंड तणावात राहत होता आणि अखेर त्याने आपले जीवन संपवले. या घटनेनंतर कळमनुरी परिसरात मोठा रोष व्यक्त करण्यात आला. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात गर्दी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली. परिस्थिती गंभीर होत असल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेनंतर मृतदेह ताब्यात घेण्यावरूनही कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संबंधितावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.