अवकाळी पावसाचा फटकान हापूस आंब्याचे दर कोसळले

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
रत्नागिरी
hapus mango कोकणात अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे रत्नागिरीतील हापूस आंब्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून स्थानिक बाजारात दर तब्बल ३०० ते ४०० रुपयांनी खाली आले आहेत.
 

unseasonal-rain-hapus mango-price-crash-ratnagiri-kokan-mango-farmers-loss 
अचानक आलेल्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे बागांमधील तयार फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी फळगळती वाढली आहे. त्यामुळे बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने नाराजीचे वातावरण आहे.हवामान विभागाने आधीच मराठवाडा आणि कोकणात वादळी वारे आणि पावसाचा इशारा दिला होता. या अवकाळी पावसाचा परिणाम केवळ हापूसच नव्हे तर इतर फळबागा आणि पिकांवरही दिसून येत आहे. राज्यात एकूणच हवामान बदलामुळे शेती क्षेत्रावर मोठे संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे.
यंदा हवामानातील अनिश्चिततेमुळे कोकणातील आंबा उत्पादनात मोठी घट झाली असून काही भागांत ५० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचेही अहवाल सांगतात.उत्पादन कमी असतानाही अवकाळी पावसामुळे गुणवत्ता आणि बाजारभाव दोन्हीवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, ग्राहकांसाठी hapus mango  मात्र हापूस आंबा तुलनेने स्वस्त मिळत असल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. मात्र या गोड फळामागे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान दडलेले आहे. पुढील काही दिवस हवामान स्थिर न झाल्यास नुकसान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सध्या रत्नागिरीतील आंबा उत्पादक शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करत असून हवामानाच्या या अनिश्चिततेमुळे कोकणातील बागायतदारांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.