नागपूर,
Aasman Foundation सामाजिक कार्यात अग्रेसर आसमान फाउंडेशन तर्फे गरजू, निराधार तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तीन दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. सेवाग्राम येथे आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मार्गदर्शनपर उपक्रम घेण्यात आले.
हे शिबिर आसमान फाउंडेशन वर्धा शाखा आणि आशा लर्निंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.Aasman Foundation शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वर्धा शाखा प्रमुख श्याम चंद्रा, रामकृष्ण धकाते, दिलीप मसने, सचिन, अमर तसेच आशा लर्निंग सेंटरच्या प्रमुख नूतन माळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी आसमान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवि गि-हे, सचिव नरेश शेंडे, सहसचिव विभा विंचुरकर, दिनेश टेकाडे, मेघा गि-हे, डॉ. साधना थोते, प्रमोद हेडाऊ व भास्कर मुलताईकर यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
सौजन्य: दिनेश टेकाडे, संपर्क मित्र