दारव्ह्यात अ. भा. आमदार चषक

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
फुटबॉल स्पर्धा आजपासून
 
दारव्हा :
Football tournament चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टसतर्फे तथा कर्तव्यदक्ष आमदार संजय राठोड, मृद व जलसंधारण मंत्री यांच्या सहकार्याने अखिल भारतीय आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेता लाईटच्या प्रकाशात संध्याकाळी 5 ते रात्री 10 यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज फुटबॉल स्टेडियमवर होत आहेत.
 

Football tournament 
 
Football tournament  यामध्ये दारव्हा, यवतमाळ, पुसद, वर्धा, नागपूर, अमरावती, गडहिंगलाज, कोल्हापूर, सांगली, जालना, मुंबई, पुणे, निमच (मध्यप्रदेश), कोरबा छत्तीसगड, आसाम यासह इतर काही संघ सहभागी होत आहेत, अशी माहिती फुटबॉल मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष गणेश भोयर डॉ. गोपाल अग्रवाल, अनिल लाभसेटवार यांनी दिली.