गुजरात टायटन्सने ८ गडी राखून नोंदवला एकतर्फी विजय!

सुदर्शनने केल्या शानदार ८७ धावा

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
चेन्नई,
gujarat-titans : इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामातील ३७वा साखळी सामना चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला, ज्यात गुजरात टायटन्सने ८ गडी राखून विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांत ७ गडी गमावून १५८ धावा केल्या.
 
 
gujarat-titans
 
 
चेंज सुपर किंग्सची सामन्याची सुरुवात खराब झाली आणि ३७ धावांवर त्यांनी ४ गडी गमावले. त्यानंतर, त्यांचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने डाव सावरला आणि शेवटपर्यंत फलंदाजी करत ६० चेंडूंमध्ये नाबाद ७४ धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडाने तीन, तर अर्शद खानने दोन बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
 
 
लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात टायटन्सने शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करून शानदार सुरुवात केली. गिल ३३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. येथून पुढे सुदर्शनला जोस बटलरची साथ मिळाली आणि दुसऱ्या विकेटसाठी ६० चेंडूंतील त्यांच्या ९७ धावांच्या भागीदारीने सामना पूर्णपणे एकतर्फी करून टाकला. या सामन्यात साई सुदर्शनने ८७ धावा केल्या, तर बटलरने नाबाद ३९ धावा केल्या. सीएसकेच्या गोलंदाजीत अकील होसेन आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.