वर्धा,
Maharashtra Government राज्यातील सर्व शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर तपासणीसंदर्भात निर्देश जारी केले आहे. पावसाळ्यात उद्भवणार्या संभाव्य धोयांचा विचार करून शाळा इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृहे आणि स्वच्छतागृहांची नियमित तपासणी व देखभाल करण्यावर शासनाने विशेष भर दिला असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

पावसाळ्यात इमारतींची पडझड, गळती, विजेचे अपघात, अस्वच्छतेमुळे उद्भवणार्या आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात घेऊन शासनाने अधिक काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. समग्र शिक्षण अभियानांतर्गत या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून सर्व शाळांनी याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शाळांच्या सर्व इमारतींची तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये इमारतींमध्ये पडलेल्या भेगा, सैल प्लास्टर, गळती होणारी छते, कमकुवत भिंती यांची तात्काळ दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. विशेषतः जुन्या आणि जीर्ण इमारतींकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. Maharashtra Government वर्गखोल्यांच्या खिडया, दरवाजे, छत आणि मजले यांची तपासणी करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी साचू नये यासाठी शाळेच्या परिसरातील निचरा व्यवस्था, गटारे आणि पाईपलाईन्स स्वच्छ व सुरळीत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
स्वयंपाकगृहातील छत, धुराडी, गॅस जोडणी, तसेच इंधन साठवण व्यवस्था सुरक्षित आहे का, याची करावी. स्वच्छतागृहांच्या बाबतीत पाणीपुरवठा, निचरा व्यवस्था, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच विद्युत यंत्रणेची तपासणी करावी. Maharashtra Government उघडी वायरिंग, खराब स्विचेस किंवा शॉर्टसर्किट होण्याची शयता असलेले भाग तात्काळ दुरुस्त करणे बंधनकारक आहे. शाळा परिसरातील मोठी झाडे, सुकलेल्या किंवा कमकुवत फांद्यांची छाटणी करून संभाव्य अपघात टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याचे साचलेले खड्डे किंवा डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करण्यावरही भर देण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये पसरणार्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अहवाल सादरीकरण व जबाबदारी निश्चित
प्रत्येक शाळेने तपासणीचा अहवाल तयार करून संबंधित शिक्षण अधिकार्यांना सादर करणे बंधनकारक आहे. धोकादायक इमारतींबाबत तात्काळ उपाययोजना करून आवश्यक निधीची मागणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. Maharashtra Government राज्यातील सर्व शाळांनी, स्थानिक स्वराज्य संस्था, पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी केले.