मुंबई
Salman Khan अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. मे 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीतला हा बिगबजेट सिनेमा समजला जात आहे. सुमारे 100 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटात रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक दमदार कलाकारांची स्टारकास्ट आहे. दरम्यान रितेशने केलेल्या एका खुलास्यानुसार या चित्रपटात एक सरप्राईज एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यानुसार ही एन्ट्री सलमान खानची असणार आहे. त्यामुळे राजा शिवाजी या चित्रपटात सलमान खान आणि अभिषेक बच्चन तब्बल 22 वर्षानंतर एकत्र दिसणार आहे.
सलमान खान कोणत्या भूमिकेत ?
मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात सलमान खान एका प्रभावी योद्याच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी चित्रपटात महत्त्वाचा सहभाग असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सकुता शिगेला पोहोचली आहे.
22 वर्षांनंतर सलमान – अभिषेक एकत्र
सलमान खान आणि अभिषेक बच्चन हे दोघे तब्बल 22 वर्षांनंतर एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. याआधी सलमान आणि अभिषेक फिर मिलेंगे या चित्रपटात एकत्र होते. हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. आता राजा शिवाजी या चित्रपटातून तब्बल 22 वर्षानंतर Salman Khan हे दोघेही एकाच चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.रितेश देशमुख आणि सलमान खान यांच्या मैत्रीची कायम चर्चा असते. रितेशच्या प्रत्येक सिनेमात सलमान कॉमिओ करताना दिसतो. याआधी रितेशच्या लय भारी सिनेमातही सलमान खान दिसला होता. आता ‘राजा शिवाजी’ सिनेमात तो कोणती भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.