अपमान खपवून घेणार नाही

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Ritesh Deshmukh महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने आपली भूमिका स्पष्ट करत शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना कडवट शब्दांत फटकारले आहे.
 

Ritesh Deshmukh 
धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल एक ऐतिहासिक किस्सा सांगत दावा केला की, गुरु-शिष्याचे नाते आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ‘‘शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते, तेव्हा ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि आपला मुकूट त्यांना देऊन म्हणाले, ‘तुम्ही हे राज्य सांभाळा’. त्यावर रामदास स्वामींनी हसून उत्तर दिलं की, ‘मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा’.’’ या विधानामुळे राज्यभर संतापाचे वातावरण आहे.
दुसऱ्या बाजूला, आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात वादग्रस्त व एकेरी भाषेचा वापर केला आणि त्यांना हिंसक इशारा दिला. गायकवाड यांनी महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत.
या वादग्रस्त प्रकरणांवर Ritesh Deshmukh  रितेश देशमुखने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रितेश सध्या आपल्या आगामी 'राजा शिवाजी' या मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. याच दौऱ्याच्या भाग म्हणून रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी भिवंडीतील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला भेट दिली आणि महाआरतीत सहभागी झाले.
मीडिया प्रतिनिधींशी Ritesh Deshmukh  बोलताना रितेशने स्पष्टपणे सांगितले की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे अपमान करणाऱ्यांना कधीही शिवप्रेमी सहन करणार नाहीत. मला विशिष्ट विधानांची माहिती नसली तरी, त्यांच्याबद्दल असलेल्या सन्मानास कोणतीही धक्का लागणारी भाषा वापरली गेली तर ती कधीही सहन केली जाणार नाही.’’रितेशने त्याच वेळी भिवंडीतील मंदिराचे आणि तिथल्या शिवइतिहासाच्या कलाकृतींचे कौतुक केले. शिवप्रेमापोटी इतके सुंदर शक्तीपीठ उभारल्याबद्दल त्याने शिवक्रांती प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटावरून त्याने पुन्हा एकदा शिवाजी महाराजांप्रती आपली निष्ठा आणि आदर व्यक्त केला.महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या ठसा गडवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या संदर्भात असलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. यावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया हे महत्त्वपूर्ण संदेश देणारी ठरली आहे.