सेलू,
Wardha News येथील नव्याने उभारण्यात आलेले बसस्थानक आज प्रवाशांसाठी उपयोगापेक्षा केवळ शोभेची वास्तू ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. नागपूरकडून येणार्या बसेस बसस्थानकात न येता थेट विद्याभारती कॉलेज परिसरातूनच मार्गक्रमण करत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या निर्णयामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणार्या कुटुंबांना तब्बल २ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. उन्हाची कडक झळ, पावसाळ्यातील चिखल आणि सुरक्षिततेचा अभाव या सगळ्यांचा सामना करत प्रवासी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले बसस्थानकच जर वापरात नसेल, तर त्याचा उपयोग नेमका कोणासाठी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. Wardha News दरम्यान, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून उभे राहिलेले हे बसस्थानक अपेक्षित सेवाच देऊ शकत नसल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेली ही सुविधा केवळ दर्शनी ठरत असेल, तर ही प्रशासनाची गंभीर निष्काळजीपणाच म्हणावी लागेल. स्थानिक प्रशासन व परिवहन विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन नागपूरकडून येणार्या सर्व बसेसना नियमितपणे सेलू बसस्थानकात थांबा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, प्रवाशांचा रोष तीव्र होण्याची शयता नाकारता येत नाही.
नागपूरवरून येणार्या बसेस सेलू बसस्थानकाच्या आतमध्ये न येता, विद्याभारती कॉलेज, बायपास मार्गे निघून जातात. त्यामुळे वृद्ध पुरुष-महिलांना दोन किमी पायपीट करून वस्तीत यावे लागते. Wardha News बसेसचा असाच प्रकार चालत राहिल्यास सेलू व वर्धा बसस्थानक पर्यवेक्षक अधिकार्यांना तसेच पालकमंत्री यांना सोमवार २७ रोजी निवेदन देण्यात येईल, असे भाजयुमाचे सदस्य धीरज पवनारकर यांनी सांगितले.