आजनसरा,
Ajansara विदर्भाचे ज्येष्ठ नेते स्व. दत्ता मेघे यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देत मेघे परिवारातर्फे आजनसरा देवस्थान येथे अन्नछत्र व धर्मशाळा इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. त्या नियोजित जागेची पाहणी माजी आमदार सागर मेघे यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १२ रोजी संत भोजाजी महाराजांच्या महापुजेसाठी आजनसरा येथे आले असता मेघे परिवारातर्फे ही घोषणा केली होती. आज त्या घोषणेची पूर्तता होताना दिसत आहे. भुकेलेल्याला अन्न द्या आणि ज्येष्ठांना आसरा द्या. आज बाबांचेच स्वप्न पूर्ण होत आहे, असे भावोद्गार माजी आमदार सागर मेघे यांनी यावेळी काढले.

भोजाजी महाराज संस्थानच्या वतीने माजी आमदार सागर मेघे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान नागपूरचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजू मिश्रा, डॉ. संजय उगेमुगे, राजू वैद्य यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत म्हणाले की, स्व. दत्ता मेघे हे आमचे प्रेरणास्थान होते. Ajansara या अन्नछत्रातून एकही भत उपाशी जाणार नाही आणि धर्मशाळेत विसावा घेणारा प्रत्येक यात्रेकरू दत्ताजींच्या मायेचा अनुभव घेईल, असेही ते म्हणाले. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष धनराज मेश्राम, सचिव शिवदास पर्बत, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर, विनोद आष्टनकर, महेश कोसूरकर, श्रावण काचोळे, शालिनी ईखार आदी उपस्थित होते.