‘धुरंधर’वरील बंदी उठल्यानंतर पाकिस्तानकडून ‘मेरी ल्यारी’ची घोषणा

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
मुंबई
Meri Lyari Pakistani film आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर आणि त्याचा सिक्वेल ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये यापूर्वी घालण्यात आलेली बंदी अखेर उठवण्यात आली आहे. कराचीतील ल्यारी परिसरातील गँगवॉरवर आधारित या चित्रपटांमुळे पाकिस्तानमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, बंदी हटवल्यानंतर आता पाकिस्तानने ‘मेरी ल्यारी’ नावाचा नवा चित्रपट सादर करत अप्रत्यक्षपणे भारतीय चित्रपटाला उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
 

Dhurandhar movie ban Pakistan Meri Lyari Pakistani film 
मेरी ल्यारी हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा प्रकारातील असून, तो दोन महिलांच्या फुटबॉलमध्ये करिअर घडवण्याच्या संघर्षमय प्रवासावर आधारित आहे. या कथेद्वारे ल्यारी शहराच्या बदलत्या प्रतिमेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकेकाळी हिंसाचार आणि गँगवॉरसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागाने गेल्या काही वर्षांत कशी सकारात्मक वाटचाल केली आहे, हे चित्रपटातून अधोरेखित करण्यात आले आहे.
या चित्रपटात आयेशा ओमर हिने एका माजी प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि गंभीर दुखापतींना सामोरे गेल्यानंतर ती पुन्हा आपल्या भागात परत येते आणि स्थानिक मुलींना फुटबॉलचे प्रशिक्षण देत त्यांना नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करते. तिच्यासोबत दानानीर मोबीन आणि ट्रिनेट लुकास यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मेरी ल्यारी’चा प्रीमिअर यूके एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला होता. दिग्दर्शक अबू अलीहा यांचा हा चित्रपट 8 मे रोजी पाकिस्तानमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्याचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
दरम्यान, सिंध प्रांताचे माहिती मंत्री शरजील मेमन यांनी या चित्रपटाचे समर्थन करताना म्हटले की, “हा चित्रपट ल्यारीचे वास्तव दाखवतो. पाकिस्तानचे नकारात्मक चित्रण करणाऱ्या एका भारतीय चित्रपटाला हे उत्तर आहे.” त्यांनी थेट नाव न घेतले असले तरी हा टोला ‘धुरंधर’कडेच असल्याची चर्चा रंगली आहे.
 
दुसरीकडे, ‘धुरंधर’ हा एक Meri Lyari Pakistani film  स्पाय थ्रिलर चित्रपट असून, त्यामध्ये रणवीर सिंह याने भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. 2000 च्या दशकातील कथानकात तो कराचीतील ल्यारी भागात सक्रिय असलेल्या रहमान बलोचच्या टोळीत घुसखोरी करताना दिसतो. या भागात तस्करी आणि दहशतवादाचे जाळे कसे विस्तारले, हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.एकूणच, ‘धुरंधर’ आणि ‘मेरी ल्यारी’ या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ल्यारीचे चित्रण करणाऱ्या चित्रपटांमुळे भारत-पाकिस्तानमधील सिनेमाच्या माध्यमातून सुरू झालेली ही अप्रत्यक्ष स्पर्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.