अनिल कांबळे
नागपूर,
Engineering student dies जिल्ह्यातील उमरेड येथे खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तरुण विद्यार्थ्याचा तलावात बुडून दुर्दैवी अंत झाला. तुषार ओमकार (२०) असे या तरुणाचे नाव आहे. उमरेड पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील आमला तालुक्यातल्या बीचभा येथील रहिवासी तुषार हा काही दिवसांपासून उमरेड येथील नगर पालिकेच्या जलतरण तलावात पोहण्याचा सराव करत होता.

काल सकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे भावासोबत पोहण्यासाठी गेला. पाण्यात पोहत असताना अचानक तो बुडाला, मात्र ही बाब त्वरित निदर्शनास आली नाही. एका तासानंतर एका व्यक्तीला पाण्याच्या खाली काहीतरी असल्याचा स्पर्श जाणवला. त्यानंतर तातडीने शोध घेतला असता तुषार बुडाल्याची माहिती उघडकीस आली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. Engineering student dies या घटनेनंतर तुषारच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून व्यवस्थापक अमोल हरिहर रायपूरकर, शैलेंद्र हरिहर रायपूरकर, प्रशिक्षक आर्यन चंदन शहाणे या तिघांवर निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला.