नागपुरात उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळा

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Entrepreneurship Guidance Workshop शहरातील मध्यवर्ती भागातील नगर भवन वस्ती येथे सुवर्णकार मंदिर सभागृहात अनुलोमच्या अनुगामी लोकराज्य महाअभियानांतर्गत नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणि उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी एक छोटी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी तसेच यशस्वी उद्योजक घडवण्यासाठी लागणारी मार्गदर्शक माहिती देण्यात आली. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे राज्य समन्वयक श्रीकांत कुळकर्णी आणि जिल्हा प्रकल्प समन्वयक करुणा शेंडे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये उद्योजकतेविषयी नवचैतन्य निर्माण झाले.
 
nagpur
 
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये महिला आणि पुरुष सहभागी मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अनुलोमच्या या प्रयत्नांचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय जनसेवक अक्षय रोहनकर यांनी करून दिला. Entrepreneurship Guidance Workshop तसेच कार्यक्रमाच्या शेवटी अनुलोमच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यशाळेला एकूण ६६ नागरिक उपस्थित होते, ज्यामध्ये २४ पुरुष आणि ४२ महिलांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.