१० वर्षांनी का होईना ,पण शेतकऱ्याला मिळाला न्याय

डाळिंबाचे पोपटाणी केले होते नुकसान

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
सेलू,
the farmer got justice हिंगणी येथील शेतकऱ्यांनी शेतात डाळिंबाची बाग लावली अहोरात्र मेहनत घेत बाग फुलवली जेव्हा बागेत डाळिंब आर्थिक संपन्नता दाखवित असताना त्या रसरशीत डाळिंबावर पोपटांची नजर गेली अन् होत्याचे नव्हते झाले. हिंगणी येथील युवा शेतकरी अजय महादेव डेकाटे यांनी दीड हेक्टर मध्ये बँक ऑफ इंडिया चे कर्ज घेऊन डाळिंबाची शेती फुलवली मार्च २०१६ मध्ये डाळिंबापासून उत्पादन मिळण्याची वेळ आली तर पोपटाणी त्या डाळिंबाला टोचणी मारून पूर्ण बागेचे नुकसान केले तेव्हा या बाबतची तक्रार वन विभागाकडे केली असता पोपट हा वन्य प्राणी नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते त्या नंतर १ आक्टोंबर २०१६ रोजी शेतकऱ्याने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयात पीटिशन दाखल केली आता त्या प्रकरणाचा निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लागला असून काही का होईना पण दिलासा मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यात घडलेल्या एका आगळ्यावेगळ्या प्रकरणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जंगली पोपटांमुळे डाळिंबाच्या बागेचे नुकसान झाल्याप्रकरणी शेतकऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
 
 
Parrot
 
दीड हेक्टर मध्ये ८०० डाळिंबाचे रोप लावण्यात आले होते त्या पैकी २०० झाडांना फळ धारणा झाली होती लाखो रुपयाचा खर्च करून शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने शेती करणे सोडून दिले असल्याचे सांगण्यात येते न्यायालयाने दिलेल्या निकालात शेतकऱ्याला प्रती झाड २०० रु. प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. the farmer got justice  मात्र या निकालामुळे शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास न्यायालयात न्याय मिळण्याची आशा वाढली आहे.
 
 
शेतकऱ्यांना वन्य प्राण्या मुळे शेतातील पिकाचे होत असलेले नुकसानीमुळे कर्ज बाजारीपणा, वाढत आहे आर्थिक दृष्ट्या कमकुवत होण्याची वेळ येत आहे, the farmer got justice  या निकालाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे असे युवा शेतकरी अजय महादेवराव डेकाटे यांनी सांगितले