हिजबुल्लाहकडून इस्रायली ताफ्यावर हल्ला

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
बेरूत,
Hezbollah attacks Israeli convoy इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून दोन्ही बाजूंमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण लेबनॉन परिसरात इस्रायली सैन्याच्या हालचालीदरम्यान हिजबुल्लाहकडून ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली संरक्षण दलाचे सैनिक आणि त्यांच्या वाहनांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. वैद्यकीय मदत आणि जखमी सैनिकांच्या स्थलांतराच्या वेळी हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यासाठी छोट्या, वेगवान आणि कमी खर्चिक ड्रोनचा वापर करण्यात आला, ज्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
 
 

Israeli convoy  
या घटनेदरम्यान ड्रोन अतिशय जवळपास पोहोचल्याचे दृश्य समोर आले असून सैनिकांनी तत्काळ प्रत्युत्तर देत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. काही ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले, तर काही जमिनीवर कोसळल्याचेही सांगितले जाते. मात्र, हा हल्ला अपेक्षित परिणाम साधू शकला नाही, असे इस्रायली बाजूकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेत कोणत्याही सैनिकाचा मृत्यू किंवा गंभीर जखमी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. दुसरीकडे, संबंधित हल्ल्याचे फुटेज प्रसिद्ध करून हिजबुल्लाहने आपली कारवाई यशस्वी झाल्याचा दावा केला आहे, तर इस्रायलने तो दावा फेटाळून लावला आहे.