प्रफुल्ल व्यास
वर्धा,
12th standard answer sheet दहावी, बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीवर आळा घालण्यासाठी सरकार, प्रशासन विविध योजनांची अमलबजावणी करते. बोर्डही त्याला साजेसे काम करते. परंतु, काही शाळा सामूहिक कॉपीसाठी कुप्रसिद्ध असतात आणि त्या शाळांचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी हा प्रकार केल्याशिवाय राहत नाहीत. समुद्रपूर तालुयातील वासी (कोरा) येथील शाळेत बारावीच्या ११८ विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेतील उत्तर सारखी आल्याने मॉडरेटरने बोर्डाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची आता बोर्डात चौकशी सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुयातील वासी (कोरा) येथील जे. डी. चौधरी ही शाळा सामूहिक कॉपीसाठी कायम कुप्रसिद्ध राहत आली आहे. वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या श्रीमंताची मुलं दहावीची परीक्षा अभ्यास करून उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. त्या मुलांना वासी (कोरा) येथील जे. डी. चौधरी विद्यालयात प्रवेश देऊन हमखास उत्तीर्ण होण्याची शंभर टके गॅरंटी दिली जाते. जे. बी. चौधरी विद्यालयात बारावी उन्हाळी परीक्षेत बॉयोलॉजीचा पेपर झाला. जमा झालेले पेपरचे गठ्ठे मुल्यांकनाकरिता संबंधीत विषयाच्या मॉडरेटरकडे गेले. 12th standard answer sheet पेपर तपासताना ११५ विद्यार्थ्यांचे उत्तर सारखी आल्याने याचे बोर्डाकडे मॉडरेटरने तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर या प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी बरावीत बॉयोलॉजीचा पेपर देणार्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्डात बोलवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. ५०-५० च्या गटातील विद्यार्थ्यांनी चौकशी समितीकडे आपले जवाब नोंदवले असल्याचे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले.
दहावी, बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी होऊ नये यासाठी बोर्ड, जिल्हास्थानावर समित्या स्थापन केल्या जातात. फिरते आणि निगरानी पथकही तयार केले जातात. बोर्ड आणि जिल्हा स्थानावरील अधिकारी अचानक भेट देऊन परीक्षा केंद्राची तपासणी करतात. त्याहीनंतर हा प्रकार जे. डी. चौधरी विद्यालयात घडलाच कसा असा प्रश्न शिक्षण वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात नागपूर बोर्डात संबंधीत प्रकरण हाताळण्याची जबाबदारी असलेल्या देशमुख यांच्यासोबत संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की आमच्याकडे पेपर तपासणार्या मुख्य समीक्षकांनी तक्रार केली. 12th standard answer sheet ते प्रकरण सामूहिक कॉपीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ११५ विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिकेतील उत्तरं साखरी आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकार्यांची समिती नेमण्यात आली आहे. ती चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे देशमुख यांनी तरुण भारतसोबत बोलताना सांगितले.