खामगाव,
Kogde Gurujis invention विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावरील शाब्दिक नोंदी ह्या आता केवळ नोंदी राहिल्या नाहीत तर विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरल्या आहेत. जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, कदमापूर येथील प्रयोगशील शिक्षक राजेश कोगदे यांनी या नोंदींना बोलके करण्याचा एक अनोखा धमाल प्रयोग केला आहे.
काय आहे हा 'धमाल' प्रयोग?
एखाद्या विद्यार्थ्याने विशेष प्रगती केली आहे पण अजून पुढे जाण्यासाठी त्याने काय करावे आणि ज्या विद्यार्थ्यांना काही विषयात अडचणी आहेत त्यावर कोणते उपाय करावेत याची जाणीव विद्यार्थ्यांना स्वतःची हुबेहूब प्रतिमा देते .विद्यार्थ्यांची प्रतिमा त्यांना ( स्वतःलाच )एक 'हटके' प्रश्न विचारते आणि त्यावर विद्यार्थी स्वतःच्या प्रगतीचे उत्तर देतो. Kogde Gurujis invention या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची बलस्थाने (Strengths) समजण्यास मदत होत आहे आणि अधिक प्रगती करण्यासाठी नेमके काय करावे, हे ते सहजपणे आत्मसात करत आहेत.
उपक्रमाचा उद्देश
विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर विद्यार्थ्यांनी केलेली विशेष प्रगती कोणती? अधिक प्रगती करण्यासाठी किंवा ज्या घटकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे त्याविषयीच्या नोंदी शिक्षकांना कराव्या लागतात यामागील उद्देश केलेल्या प्रगतीपेक्षा आणखी प्रगती कशी करावी व कोणत्या घटकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे याची विद्यार्थी व पालकांना जाणीव व्हावी हा आहे.परंतु ह्या सर्व नोंदी त्या प्रगतीपुस्तकापुरत्याच मर्यादित राहतात. Kogde Gurujis invention असे होऊ नये आणि एखाद्या विद्यार्थ्याने केलेली विशेष प्रगती याची जाणीव त्या विद्यार्थ्यांना तर व्हावीच शिवाय आणखी प्रगती व सुधारणा आवश्यक असतील तर त्यामध्ये यश मिळविण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत त्या उपायांची विद्यार्थ्यांना जाणीव होऊन त्याआधारे अंमलबजावणी करुन केलेल्या नोंदींची उपयोगीता वाढविणे हा या उपक्रमामागचा हेतू आहे.शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी उमेश जैन, केंद्रप्रमुख रवींद्र चेके, मुख्याध्यापक पल्हाडे या अधिकाऱ्यांची प्रेरणा मिळत असल्याचे शिक्षक कोगदे यावेळी म्हणाले.